मुंबई: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोना तसेच ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याच सोबत सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत. याचा परिणाम आझाद मैदानावर सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर देखील होत असल्याचे दिसत आहे.
आझाद मैदानावर मागील दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेल्या नव्या नियमावलीनुसार आता या कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेसाठी आझाद मैदान सोडावं लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. एसटी कर्मचारी विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याने तेथून हलण्यास तयार नव्हते, मात्र आता ठराविक वेळा साठी आंदोलकांना हे मैदान सोडवं लागणार आहे.
सरकारच्या नियमावलीनुसार आम्ही संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत आझाद मैदानातू बाहेर पडणार आहोत. मात्र, पाहाटे ५ वाजता आम्ही पुन्हा एकदा आझाद मैदानावर दुखवटा पाळणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही हा निर्णय घेतल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्याच सोबत आमची बाहेर राहण्याची आणि खाण्याची सोय झाल्याचंही कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
- राज्यात लॉकडाऊन होणार?; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
- पहिल्यांदाच आई शब्द कानी पडताच भावूक झाली अनुष्का ; व्हिडिओ केला शेअर
- तुम्ही हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन तर…; मुनगंटीवारांचा पवार, परबांवर निशाणा
- जिल्हा बँक निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सोशल मीडियावर ‘त्या’ मिमची जोरदार चर्चा
- ‘विना प्रमुखाचं हे राज्य कसं चालेल’; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

