Share

चाहत्यांसाठी क्रिकेटची मेजवानी; यंदा एक नव्हे तर तीन बॉक्सिंग डे कसोटी सामने होणार

Published On: 

ऑस्ट्रेलिया : क्रिकेट जगतामध्ये २६ डिसेंबरला २०२० ला एक वेगळेच महत्व दिले जाते. २६ डिसेंबर दिवशी जवळपास गेले ४० वर्षे नियमितपणे कसोटी सामने होत असतात. त्यातही ऑस्ट्रेलियामध्ये मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर होणारा बॉक्सिंग डे कसोटी सामना प्रसिद्ध आहे.

दरवर्षी २६ डिसेंबरला होणाऱ्या सामन्याला बॉक्सिंग डे कसोटी असे म्हटले जाते. २६ डिसेंबर दिवशी ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका देशातही बऱ्याचदा कसोटी सामने होत असतात. यंदा देखील या तिन्ही देशात बॉक्सिंग डे कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर बॉक्सिंग डे कसोटी सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात होईल. हा सामना या दोन उभय संघातील ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५ वाजता सुरुवात होईल. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलिया मालिकेत भक्कम आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल, तर भारतीय संघ मालिकेत पुनरागमन करण्याच्या इराद्याने उतरेल.

२६ डिसेंबर न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिलाच सामना बॉक्सिंग डे कसोटी सामना असेल. हा सामना माउंट मोंगनूईच्या बे ओव्हल स्टेडियममध्ये होईल. हा सामना भारतीय वेळेप्रमाणे पहाटे ३.३० सुरु होईल.

यावेळी तिसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघात खेळवला जाईल. या सामन्याने या दोन देशांतील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होईल. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील सेंच्यूरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होणार.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!