🕒 1 min read
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. भाजपाने हा कार्यक्रम शुक्रवारी ‘उत्सव’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. या आयोजित कार्यक्रमांमध्ये एक कोटी शेतकरी सहभागी होतील हे सुनिश्चित करण्यात आलेय.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचं वाटप केलं जाणार आहे. दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील 9 कोटी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या कार्यक्रमात 1 बटन दाबून 9 कोटी शेतकरी लाभार्थ्यांना 18 हजार कोटी रुपये थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेचा शुभारंभ होणार आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना 6 हजार रुपये थेट अनुदान दिलं जातं. 2 हजार रुपयाप्रमाणं तीनवेळा ही रक्कम बँकेत जमा होते. पीएम किसान योजना लाँच केल्यानंतर मोदी देशातील शेतकऱ्यांना संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात गुरुवारी रात्री उशिरा माहिती दिली आहे. देशातील बळीराजासाठी उद्याचा दिवस खूप महत्त्वपूर्ण असेल. दुपारी 12 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18 कोटी रुपयांची रक्कम म्हणजेच प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहेत. या निमित्तानं शेतकरी बांधवांसोबत संवाद साधण्याची संधी मिळणार आहे असं पंतप्रधान मोदींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस सर्वसामान्यांना ताकद देणारा पक्ष : बाळासाहेब थोरात
- ‘विदर्भ पुन्हा एकदा काँग्रेसचा बालेकिल्ला करुन काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडूण आणू’
- कोविड परिस्थितीमुळे राज्यातील मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याचा निर्णय
- ‘मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे’
- मद्यविक्रीच्या अनुज्ञप्तींना शुल्कात सूट देण्याच्या निर्णयावरून श्वेता महालेंची राज्य सरकार टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
