मुंबई : झी मराठीवर १२ वर्षापूर्वी सारेगम लिटील चॅम्प या गायनाच्या कार्यक्रमाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. याच कार्यक्रमातील पंचरत्नापैकी एक आर्या आंबेकर. आर्याने गायनाने त्या कार्यक्रमात जे वेड लावले ते आजही कायम आहे. आजही तिने गायलेल्या गाण्याना अनेकांकडून पसंती मिळत आहे. नुकताच आर्याचा सुंदर गाण्याचा एक व्हीडीओ तिने सोशल मिडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/reel/CSTQeFLIo5W/?utm_source=ig_web_copy_link
आर्याने शेयर केलेल्या या व्हिडिओत तिने ‘ओल्या सांजवेळी’ हे गाणं गायलं आहे. सोबतच बहारा बहारा हे गाणंही गायलं आहे. सुंदर रिमिक्स तिने केलं आहे. आर्या आपल्या आवजात या गाण्याची आणखीनच गोडी वाढवली आहे. आर्याचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांनाही फारच आवडला आहे. अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान आर्या सोशल मिडियावर सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मिडियावर शेअर करत असते. आर्याचा मोठा चाहतावर्ग आहे. सद्या आर्या झी मराठीवरील सारेगम लिटील चॅम्प कार्यक्रमात ती ज्युरीची भूमिकेत दिसत आहे.
आर्याने २०१७ मध्ये सतिश राजवाडे दिग्दर्शित ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले. या चित्रपटात तिची तन्वीची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलुन धरली. गायनासोबत अभिनयातही अर्या आंबेकरने वेगळा ठसा उमटवला. झी मराठी वरील सध्या सुरु असलेल्या ‘माझा होशील ना’ या कार्यक्रमाचे शीर्षक गीत गायले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नीरजच्या यशानंतर मिल्खा सिंग यांच्या मुलाने व्यक्त केली भावना, म्हणाला…
- ‘ख्वाहिश आपको सोने ना दे’ ; नीरज चोप्रानं ४ वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट होतयं व्हायरल
- ‘मोदींना भाजप विचारसरणीचे न्यायाधीश पाहिजे’, पी.चिदंबरम यांची टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई


