Share

नासीर हुसैननंतर शेन वॉर्नने इंग्लंडच्या खेळाडुवर साधला निशाणा, म्हणाला..

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड दोन्ही संघात लॉर्ड्स येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. आखेरच्या दिवशी न्युझीलंडच्या संघाने ६ बाद १६९ धावांवर डाव घोषीत केला. चौथ्या डावात इंग्लंड समोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ ३ बाद १७० धावापर्यंत मजल मारु शकला. न्युझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने पहिल्या दिवसापासुन वर्चस्व गाजवले होते. मात्र अखेरच्या दिवशी इंग्लंडच्या संघाने सावध फलंदाजी करत सामना अनिर्णीत राखण्यात यश मिळवले आणि पराभव टाळला. मात्र या पराभवानंतर इंग्लंडच्या संघावर सर्व स्तरातुन टिका होत आहे. इंग्लंडच्या खेळाडुवर माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी बोचरी टिका केली होती. यानंतर ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटु शेन वॉर्न याने ट्विट करत इंग्लंडच्या संघावर टिका केली आहे. या ट्विट मध्ये, ‘इंग्लंडच्या संघाने कालच्या सामन्यात ज्या नकारात्मक पद्धतीने खेळ केला ते बघुन फारच निराश झालो आहे. कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी लक्ष्य गाठण्याची एक मोठी संधी त्यांनी गमावली.’ असे म्हणाला.

या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्याच्या दृष्टीने इंग्लंडच्या संघाने साधा प्रयत्नही केला नाही. इंग्लंडचा संघ पहिल्या चेंडुपासुनच सामना अनिर्णीत राखण्यासाठी खेळत होता. २७३ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडला ३ च्या धावगतीने खेळण्याची अवश्यक्यता होती. मात्र इंग्लंडने बचावात्मक पवित्रा घेत ३ गडी गमावत १७० धावापर्यंत मजल मारत सामना अनिर्णीत ठेवला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!