नागपूर: व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोरोनाने ओढावलेली परिस्थिती फडणवीसांच्या कानावर घातली. आता आम्हाला जगायचं असेल तर दुकानं चालू करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सरकारने जर आता नागपूरमधले निर्बंध शिथील केले नाहीत तर आम्ही सरकारचे न ऐकता दुकाने उघडू, अन्यथा असहकार आंदोलन करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी फडणवीसांना भेटल्यानंतर व्यक्त केला आहे.
नागपूर जिल्हयात कोरोना रुग्णसंख्या कमी असतानाही, निर्बंध शिथिल झाले नाही. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील व्यापारी संतप्त झाली आहेत. व्यापाऱ्यांच्या एका शिष्टमंडळानी २ जुलैरोजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर समस्या मांडल्या आहेत. त्यामुळे नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यात दिले होते.
आता व्यापाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी निर्बंध शिथिल करून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी अन्यथा राज्य सरकारविरोधात ‘असहकार’चा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी मोदींची परवानगी घ्यावी लागेल’, चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य
- ‘लांब फेकणारा खेळाडू टोकियोला गेला नाही, त्यामुळे भारताने गोल्डन संधी गमावली’, काँग्रेसचा टोला
- ‘शब्दांचे खेळ, भावनिक आवाहन, ड्रायव्हिंगशिवाय येतंय काय? मग शरद पवारांनी कौतूक केले कशाचे?’
- बीसीसीआयचा पीसीबीला असाही झटका, पाकविरुद्धची मालिका सोडून खेळाडू खेळणार आयपीएल
- खुशखबर! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील खेळपट्टी फिरकीपटूसाठी पोषक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

