🕒 1 min read
नवी दिल्ली: गेल्या तीन दशकांमधील भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गायक केके यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन (KK dies at 53) झाले. त्यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. केके यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
“प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुननाथ यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले. के.के. यांच्या गाण्यांमध्ये सर्व वयोगटातील लोकांमधल्या विविध प्रकारच्या भावनांचे प्रतिबिंब दिसून येते. त्यांच्या गाण्यातून आम्ही त्यांची आठवण कायम ठेवू. ओम शांती!”, असे ट्वीट नरेंद्र मोदी (narendra modi) यांनी केले आहे.
Saddened by the untimely demise of noted singer Krishnakumar Kunnath popularly known as KK. His songs reflected a wide range of emotions as struck a chord with people of all age groups. We will always remember him through his songs. Condolences to his family and fans. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 31, 2022
दरम्यान कोलकाता येथे एका कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असताना केकेला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे तो परत हॉटेलवर गेला. तसा तो कोसळला. त्यानंतर त्याला कलकत्ता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
महत्वाच्या बातम्या:
- “गायक KK यांचं अकाली झालेलं निधन मनाला चटका लावणारं”, रोहित पवारांनी व्यक्त केला शोक
- “महाराष्ट्राचे राजकारण पवारांशिवाय पूर्णच होत नाही पण…”, प्रवीण दरेकरांचा टोला
- ‘आंखों में तेरी अजब सी…’, गाणारे प्रसिद्ध गायक KK यांचे निधन
- “विराट कोहलीनं वयाच्या ४५व्या…” शोएब अख्तरनं दिला जबरदस्त सल्ला; काय म्हणाला? वाचा!
- IND vs SA : भारताचा ‘हा’ युवा गोलंदाज ठरू शकतो आफ्रिकेच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी; वाचा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
