Share

तब्बल पाच दशकानंतर गौताळ्यात पट्टेदार वाघाचे दर्शन

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद येथील गौताळा अभयारण्यात पट्टेदार वाघ असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये या वाघाचे छायाचित्र कैद झाले आहे. या आधी १९७० मध्ये इथे वाघ दिसला होता त्या नंतर तब्बल पाच दशकानंतर वाघाचे दर्शन झाल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या वाघाच्या पायाचे ठसे येथील वन अधिकाऱ्यांना दिसले होते. त्यामुळे या वाघाचा शोध घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे अभयारण्यात बसवले होते. १५ मार्च रोजी कॅमेरामध्ये या वाघाचे दृश्य कैद झाले असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. तब्बल पाच दहाकानंतर वाघ आढळल्याने त्याच्या संवर्धनावर लक्ष द्यावे लागणार आहे.

गौताळा अभयारण्यात १९४० मध्ये त्यानंतर १९७० मध्ये वाघ दिसला होता आणि आता त्यानंतर थेट २०२१ मध्ये पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून हा वाघ आला असून तो दोन वर्षांचा असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी लॉकडाऊन होते त्यामुळे सर्वत्र पर्यटन बंद होते. त्यामुळे प्राण्यांना मुक्त संचार करता आला तसेच येथील अभयारण्य वाघांसाठी पोषक असल्यामुळे या भागात आला आसावा असा अंदाज वर्तविला जात आहे. मोठ्या कालावधीनंतर इथे वाघ दिसल्याने आता वनविभागातर्फे त्याच्या संवर्धनासाठी उपाययोजनांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!