🕒 1 min read
श्रीनगर : मागील काही दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांची हत्या केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आजपासून तीन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर असून त्याची सुरुवात श्रीनगरपासून होणार आहे. त्यामुळे शहा यांच्या या दौऱ्यासाठी अत्यंत तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचे दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर अमित शहा यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० हटवण्यात आला होता.
शहा यांचा मुक्काम तीन दिवस राज भवनामध्ये असणार आहे. मागील महिन्याभरात काश्मीरमध्ये ठरवून तब्बल ११ निष्पाप नागरिकांच्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हत्या केल्या आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा दौऱ्याच्या पहिल्या दिवशी श्रीनगर-शारजा प्रवासी विमान सेवेचे उद्घाटन करणार आहेत. श्रीनगर ते शारजा अशी ही थेट विमानसेवा असणार आहे. मागच्या महिन्यात केंद्रीय हवाई उड्डायाण मंत्र्यांनी याची घोषणा केली होती. अलीकडेच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची अमित शहा भेट घेणार आहेत. त्यानंतर उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक करुन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतील. शहा यांच्या दौऱ्याच्यावेळी सुरक्षेत कुठलीही कमतरता राहणार नाही. याची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे. ड्रोन्स, अचूक नेम असलेले स्नायपर्स, शार्पशूटर्स तैनात करण्यात आले आहेत. दल लेकमध्ये सीआरपीएफच्या शस्त्रसज्ज कमांडोजच्या मोटरबोटी मधुन फेऱ्या सुरु आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- ‘कोरोनामुळे जीव गमावलेल्या ४.५३ लाख कुटुंबीयांना माफीनामा लिहून द्या’, ‘काँग्रेस’ची मागणी
- भारत-पाक सामन्यापूर्वी BCCI ने उचलले मोठे पाऊल, ‘या’ चार खेळाडूंना दिले मायदेशी परतण्याचे आदेश
- ‘नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे’
- WhatsApp ही विदेशी कंपनी, भारतीय कायद्याला विरोध करु शकत नाही; केंद्र सरकारचे खडेबोल


