🕒 1 min read
मुंबई : इंग्लंड दौऱ्यातील डब्ल्युटीसी सामना गमावल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू हे २० दिवसाच्या सुटीवर गेले होते. या दरम्यान इंग्लंडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढतच होता. यादरम्यान भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती.
मात्र २२ जुलै रोजी कोरोनावर मात करुन भारतीय संघात परत आला. संघात परतताच प्रशिक्षक रवी शास्त्रीने रिषभ पंतचे पुष्पहार घालून स्वागत केले. या स्वागतानंतर रिषभ पंतने एक ट्विट करत स्वत:ला बाजीगर ही उपमा दिली आहे. या ट्विटमध्ये त्याने लिहीले की, ‘हार के बाद ही जीत है और जितने वाले को कहते है बाज़ीगर’ यात त्याने गळ्यात घातलेल्या हाराकडे इशारा करत हे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये तो पुढे म्हणाला,’परत आल्याचा आनंद झाला, रवी शास्त्री या स्वागताबद्दल खुप धन्यवाद’ असे लिहीले.
हार ???? के बाद ही जीत है और जितने वाले को कहते है बाज़ीगर????????
Thrilled to be back. Thank you @RaviShastriOfc for this grand welcome pic.twitter.com/qy8QN2waqv— Rishabh Pant (@RishabhPant17) July 22, 2021
इंग्लंड दौऱ्यातील डब्ल्युटीसी स्पर्धेंच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ सुटीवर गेला होता. यादरम्यान रिषभ पंतने युरोकप स्पर्धेच्या काही सामन्याला हजेरी लावली होती. यावेळी त्याने मास्क परिधान केल्याचे दिसुन येत होते. काही दिवसातच त्याला कोरोनाची लागण झाली. उपचारानंतर १८ जुलै रोजी त्याचा विलगीकरणाचा कालावधी संपुष्टात आला. ५ ऑगस्टपासुन सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठीही तो उपलब्ध असेल.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘या’ दोन खेळाडूंना तिसऱ्या वनडेमध्ये मिळू शकतो ब्रेक
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- अखेर रसिका आणि असिफ यांचा बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह पडला पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

