🕒 1 min read
श्रीलंका : भारतीय युवा खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताने आपली विजयी घौडदौड कायम ठेवली. टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तीन विकेटने विजय मिळवला. दुसरा सामना जिंकत टीम इंडियाने मालिकाही खिशात घातली. या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे.
आता टीम इंडिया तिसरी मालिका जिंकत श्रीलंकेला व्हाईट वॉश करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या सामन्यासाठी भारतीय टीममध्ये काही बदल होऊ शकतात. मिळलेल्या माहितीनुसार या सामन्यात ओपनर पृथ्वी शॉ आणि विकेट कीपर इशान किशन यांना ब्रेक देण्यात येणार आहे.
पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि किशन हे दोघेजण फॉर्मात होते मात्र दुसऱ्या सामन्यात दोघेही खराब फॉर्मात दिसून आले. आखेलरच्या म्हणजेच तिसऱ्या सामन्यात पृथ्वी शॉऐवजी ऋतुराज गायकवाड किंवा देवदत्त पडिक्कल यांच्यापैकी कोणा एकाला संधी मिळू शकते. तर इशान किशनऐवजी संजू सॅमसनला घेतले जाऊ शकते.
संभाव्य टीम :
शिखर धवन, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, देवदत्त पडिक्कल/ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, संजू सॅमसन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजेवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या
- इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला दुखापतीने ग्रासले, बीसीसीआय करणार निवड समितीशी चर्चा
- दुखापतीमुळे टीम इंडियाचा तिसरा खेळाडू इंग्लंड दौऱ्यातून बाहेर
- पुण्यात आज १८७ कोरोनाबाधितांना मिळाला डिस्चार्ज ; तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
- ‘राज्य सरकारचा बेफिकिरपणा आणि ढिसाळ नियोजनामुळे कोकणामध्ये पूरस्थिती’
- अखेर रसिका आणि असिफ यांचा बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह पडला पार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

