🕒 1 min read
मुंबई : ‘बिग बॉस ओटीटी’ला देखील प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यातील अनेक स्पर्धकांचे कौतुक झाले तर अनेकांवर टीका देखील करण्यात आली. मात्र या सगळ्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी’ची विजेती दिव्या अग्रवाल ठरली आहे. तसेच या शो दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी चांगलीच चर्चेत राहिली आहे. नुकतेच ‘बिग बॉस ओटीटी’चे विजेतेपद दिव्या अग्रवालला देण्यात आले. या शोमध्ये निशांत भट्ट रनरअप ठरला असून शमिता शेट्टी तिसऱ्या स्थानावर राहिली.
https://www.instagram.com/p/CUADZCNL28N/?utm_source=ig_web_copy_link
शमिता घरी परतल्यानंतर तिचे शिल्पाने खास पद्धतीत स्वागत केलं आहे. शिल्पा शेट्टी इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत शमिताचे घरी स्वागत केले आहे. तिने शमिता सोबत एक फोटो शेअर केला आहे. तसेच या फोटोला तिने कॅप्शन दिलं, ‘माझी टुनकी परत आली आणि आता तुला घट्ट मिठी मारण्यापासून मला कोणी थांबवू शकत नाही. तुझे घरी तुझे खूप स्वागत आहे.’
दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात अटक केल्यापासून शिल्पालाही प्रश्न विचारले जात आहेत. पतीला अटक झाल्यापासून शिल्पाला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले. यामुळे तिला आणि कुटुंबाला अधिक मनस्ताप सहन करावा लागला होता. मात्र या कठीण परिस्थितून ती स्वत: ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यानंतर आता ती बहिण शमितासोबत आपला वेळ व्यतित करताना दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा कधी खेळेल सामना?, प्रशिक्षकाने केला खुलासा
- ‘कोल्हापूरला पोहचण्याआधीच पोलिसांचा मज्जाव, सोमय्यांना कराड येथे रोखलं’
- पंजाबमध्ये असणार आता दोन उपमुख्यमंत्री; नवज्योतसिंग सिद्धूंच्या सहमतीनेच मुख्यमंत्र्यांची निवड
- मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने चेन्नईला सावरलं; झुंजार अर्धशतक पूर्ण
- ‘मला गृहमंत्र्यांना विचारायचं, तुम्ही कोणत्या अधिकाराअंतर्गत गणेश विसर्जनापासून रोखलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
