Share

क्रिकेटमधील नियम बदलल्यानंतर सचिन तेंडूलकरचे वक्तव्य; म्हणाला, मंकडिंग धावचीत आणि…

Published On: 

नवी दिल्ली : एमसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये नव्या बदलांची घोषणा केली आहे. मंकडिंगला धावचीत घोषित करणे. चेंडूची लकाकी वाढवण्यासाठी लाळेच्या वापरास पूर्ण बंदी तर अनेक बदल १ ऑक्टोबरपासून अमलात येणार आहेत. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नव्या नियमांमुळे खेळाडूंचा कस लागणार आहे.

एमसीसी ही संस्था क्रिकेट कायद्यांचे संरक्षक आहे. मंकडिंग बाद, लाळेचा वापर, वाइड बॉल आणि डेड बॉलसह अनेक नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. हे सर्व नियम यावर्षी १ ऑक्टोबरपासून लागू होतील. या नियमांबाबत मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकर यांनीही याला सहमती दर्शवली आहे.

सचिन तेंडुलरकर यांनी सांगितले की, “एमसीसी समितीने नवीन नियम जारी केले आहेत. मी यापैकी काही नियमांचे समर्थन करतो. पहिला नियम म्हणजे मंकडिंग आउट आहे. यापूर्वी मंकडिंग हा शब्द वापरल्याने मला नेहमीच अस्वस्थ वाटले आहे. मात्र याचे रूपांतर आता धावबादमध्ये झाले याचा मला खूप आनंद झाला आहे. माझ्या मते धावबाद असायलाच हवा, त्यामुळे आमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे.

तर दुसरा नियम बॅटर झेलबाद झाल्यानंतर मिळणाऱ्या स्ट्राइकबाबतचा आहे. नव्या नियमामुळे झेल पकडताना दोन्ही खेळाडूंनी धाव घेतली आणि झेलबाद झाला. तरी नव्या फलंदाजाला फलंदाजीसाठी स्ट्राइक यावं लागेल. हा नियम अगदी बरोबर आहे. कारण एखाद्या गोलंदाजाने गडी बाद केला तर त्याला नवीन फलंदाजाला गोलंदाजी करून विकेट घेण्याची संधी मिळेल.”

कलम क्रमांक १८नुसार फलंदाज झेलबाद झाल्यास नवा फलंदाज स्ट्राइकला म्हणजेच फलंदाजीला येईल. बाद झालेला खेळाडू नॉन-स्ट्राइकला म्हणजेच समोरच्या बाजूला पोहोचला असेल तरी नवा फलंदाज हाच फलंदाजी करील. तो षटकातील अखेरचा चेंडू असल्यास मात्र स्ट्राइक बदलला जाईल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!