🕒 1 min read
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक डाऊनच्या दरम्यान उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसल्याने अनेक उद्योग-व्यवसाय यांनी आपले उत्पादन थांबवली होती त्यामध्ये चार चाकी वाहनांचे उद्योगाला मोठा ब्रेक लागला होता. मात्र आता या प्रक्रियेनंतर हळूहळू अर्थव्यवस्थेला गती येत असताना वाहन खरेदीला देखील ग्राहकांकडून मिळत असलेला उद्योग-व्यवसाय यांचे वाहन उत्पादन पुन्हा गतिमान होत आहे. भारतातली सगळ्यात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी, महिंद्र एण्ड महिंद्र, मर्सिडिज बेन्झ आणि फियाट क्रिसलेर यांनी आपण कोरोनामुळे कार उत्पादन थांबवत असल्याचं सांगितलं होत.
या दरम्यान आता वाढत्या इनपुट कॉस्टचा प्रभाव कमी करण्यासाठी चारचाकींसह आता दुचाकी वाहनंदेखील महाग होणार आहेत. पुढील महिन्यापासून केवळ कार निर्मात्या कंपन्याच नव्हे तर दुचाकी वाहन उत्पादक कंपन्यांनीदेखील दुचाकींच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी यावर्षीच्या जानेवारी महिन्यात दुचाकी आणि चारचाकी वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहनांच्या किंमती वाढवल्या होत्या. आता पुन्हा एकदा वाहनांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.
आतापर्यंत अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मारुती सुझुकी, रेनॉ, निसान, इसुझू या कंपन्यांचा समावेश आहे. त्यानंतर देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पनेदेखील त्यांच्या दुचाकींची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. आता यात कावासाकी कंपनीचीसुद्धा भर पडली आहे.
1 एप्रिलपासून ते आपल्या बाईकच्या किंमती वाढवणार आहेत. जपानी प्रीमियम टू व्हीलर कंपनीने असा निर्णय घेतला आहे की ते आपल्या देशातील बहुतांश बाईकच्या किंमती वाढवणार आहे. यात निंजा स्पोर्ट टूर रेंजर आणि Versys बाइक्सचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार नवीन किंमतींचा कावासाकी निंजा 300 आणि निंजा झेडएक्स -10 आरवर (ZX-10R) कोणताही परिणाम होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- वाईट सुरुवातीनंतरही भारतीय संघ कसा उभारतोय मोठी धावसंख्या
- पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कारण ऐकून सेहवाग कोहलीवर भडकला
- निष्काळजीपणा भोवणार ; महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर ?
- घरबसल्या दहा मिनिटात मिळवा पार्लरसारखा ग्लो ; करा ‘हा’ उपाय
- शेतकऱ्यांची वीज तोडली;भाजपा आमदाराने वीज कंपनीच्या अभियंत्याला दोरीने बांधलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
