Share

पोरा नाव गाजवलंस! लक्षवेधी कामगिरी केल्यानंतर ऋतुराज गायकवाडवर कौतुकाचा वर्षाव

Published On: 

चिंचवड : आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी करून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधलेल्या ऋतुराज गायकवाड याची महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. यंदाच्या सत्रात चेन्नईला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. चेन्नई संघाला शेवटून दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागत आपला गाशा गुंडाळावा लागला.

मात्र, या आयपीएल सत्रात महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब घडली आहे. पिंपरी-चिंचवड येथील सांगवीतील रहिवासी असलेल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने केलेली चमकदार कामगिरी ही अविस्मरणीय आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना शेवटच्या तीन सामन्यांमध्ये तीन अर्धशतके ठोकले आहेत. त्याच्या या खेळाने सर्व क्रिकेटरसिक प्रभावित झाले आहेत.

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याचे पिंपरी-चिंचवडनगरीत आगमन झाले आहे. ही बाब कळल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांपासून ते क्रिकेटप्रेमींनी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्याचा उत्साह वाढवला आहे. आता मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी देखील दखल घेऊन त्याचा सत्कार केला आहे. बारणे यांनी सांगवीतील त्याच्या राहत्या घरी जाऊन त्याचं कौतुक केलं आहे.

त्यामुळे आता खेळाकडे आकर्षित असलेल्या अनेक चिमुकल्यांपासून ते युवक-युवतींना यातून प्रोत्सहन मिळत असून अनेकांनी देशासह राज्याचं नाव मोठं करावं यासाठी हे पाऊल महत्वाचं मानलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!