Share

१० तासांच्या अथक प्रयत्नानंतर तहसीलदारांच्या पथकाने सालगड्यास काढले पुरातून बाहेर

Published On: 

लातूर : निलंगा तालुक्यातील मुगाव-मसलगा गावच्या हद्दीतील मांजरा नदीला पूर आल्याने एक सालगडी नदीत अडकला होता. याची माहिती सरपंच व जिल्हा परिषदेच्या सदस्याने ही माहिती तहसीलदारांना सांगितली. तहसीलदारांनी यंत्रनांना माहिती दिली. त्यानंतर १० तासांचे अथक परिश्रम घेत बोटीद्वारे या पथकाने या सालगड्यास बाहेर काढले.

निलंगा तालुक्यातील मुगाव-मसलगा गावच्या हद्दीवर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वांजरखेडा शिवारातील शेतकरी गोविंद जाधव व उध्दव शेळके रा. लातूर यांची शेतजमीन आहे. त्यांच्या शेतात शिवाजी भिमराव कुदरे रा. देगलूर जिल्हा नांदेड हा सालगडी आपल्या कुटुंबासह शेतात राहत होता. मांजरा धरणानाचे सर्व दरवाजे उघडण्यात आल्याने मांजरा नदीला पुर आला होता. २८ सप्टेंबर रोजी ५ वाजता शिवाजी कुदरे यांनी आपल्या कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी हलवले व पाणी जास्त वाढणार नाही म्हणून शिवाजी कुदरे शेतातच थांबला होता. मात्र रात्री पाणी वाढत असल्याचे पाहून त्याने शेतातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत तो चहुबाजूने वेढला गेला होता. त्यानंतर शिवाजीने जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ यांना फोन करून पुराच्या पाण्यात अडकल्याचे सांगितले.

सुरेंद्र धुमाळ यांनी निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव यांना तात्काळ या घटनेची माहिती सांगितली. सदरील घटनेची माहिती मिळताच तहसीलदार गणेश जाधव या तलाठी मंडळ अधिकारी यांच्याशी चर्चा केली मदतीच्या सुचना केल्या. सर्वांनी शिवाजीसोबत रात्री फोनवर संपर्क करून धीर दिला. सकाळी बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव हे मंडळ अधिकारी राजकुमार देशमुख, तलाठी प्रवीण कस्तुरे, तलाठी अर्चना चौहान, वांजरखेडा तलाठी कवडे आदीसह बचाव कार्यासाठी टीम घेऊन मसलगा मुगाव शिवरस्त्यावर घटनास्थळी पोहचले.

व बचाव पथकातील जवानानी शिवाजी कुदरे या सालगड्याला १० तासांच्या अथक परिश्रमानंतर बोटीद्वारे पुरातून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर मसलगा येथील शेतकरी दगडू रामा आरेराव यांची गाय व म्हैस सुरक्षित ठिकाणी हलवली. पुरातून बाहेर येताच तहसीलदार गणेश जाधव यांनी शिवाजीची विचारपूस करत स्वागत केले. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना पूरस्थितीबाबत सावधान राहण्याचे आवाहन केले. मागील १० वर्षापूर्वीदेखील मांजरा नदीच्या पुरात असाच एक सालगडी अडकला होता. याची आठवणही ग्रामस्थांनी तहसीलदारांना सांगितली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!