Share

अखेर ठरलं : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे आणि कधी होणार ?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- विधिमंडळाचे यंदाचे हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत घेण्यात येणार आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पाटोले यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज मंत्री ॲड.अनिल परब, मंत्री सर्वश्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, दिलीप वळसे-पाटील, सुभाष देसाई, अनिल देशमुख, सतेज पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासह विधानपरिषद आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, भाजपने हिवाळी अधिवेशन किमान १५ दिवसांचे असावे अशी मागणी केली होती. तसेच, हे अधिवेशन नागपूरात व्हावे अशीही मागणी केली होती. मात्र, हिवाळी अधिवेशन आता मुंबईत २ दिवसांसाठी होणार हे निश्चित झाले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे. ”केवळ दोन दिवसांचं अधिवेशन आम्हाला मान्य नाही,असं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!