🕒 1 min read
नवी दिल्ली- देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत भारताने गेल्या 24 तासात 88.13 लाखाहून जास्त मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या आहेत. लसीकरण अभियान सुरु झाल्यापासून एका दिवसातले साध्य केलेले हे सर्वाधिक लसीकरण आहे. याबरोबरच भारताच्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 55 कोटीचा महत्वाचा टप्पा काल गाठला.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 62,12,108 सत्रांद्वारे 55,47,30,609 मात्रा देण्यात आल्या आहेत.
21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.कोरोनातून बरे होण्याचा दर 97.51% झाला असून मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,14,48,754 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 36,830 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
भारतात 154 दिवसातल्या सर्वात कमी (25,166) नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.सलग 51 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या, 3,69,846 असून 146 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 1.15% असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.
चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करत देशात गेल्या 24 तासात 15,63,985 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 49.66 कोटीहून अधिक (49,66,29,524) चाचण्या केल्या आहेत.साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.98% असून गेले 53 दिवस 3% पेक्षा कमी आहे. आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर आज 2.04% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी 1.61% असून दर गेले 22 दिवस 3% पेक्षा कमी तर सलग 71 दिवस 5% पेक्षा कमी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ नामकरण प्रस्ताव मंजूर न झाल्यास सभागृह चालू देणार नाही- भाजप
- शेअर बाजारात नवा उच्चांक, निफ्टी पहिल्यांदाच १६,६१४ पातळीवर बंद
- ‘बैलगाडी शर्यत सुरू करण्यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळेंना भेटणार’
- मासिक १६ लाखाचे देयक देऊनही पैठण शहरातील गटारीचे पाणी रस्त्यावर!
- शाळा बंदच! बालभारतीकडून लाखो पुस्तके रद्दीत देण्यासाठी टेंडर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
