Share

मासिक १६ लाखाचे देयक देऊनही पैठण शहरातील गटारीचे पाणी रस्त्यावर!

Published On: 

औरंगाबाद : पैठण नगर परिषदेत कार्यरत स्वच्छता एजन्सीला मासिक १६ लाख ६६ हजाराचे देयक देऊनही गटारीचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरीकांनी सांड पाणी वळवण्यासाठी थेट काॅंक्रीट रस्तेच फोडले आहे.

पैठण नगर परीषदेने शहर स्वच्छतेचा ठेका एका एजन्सीला दिलेला आहे, आणि या एजन्सीने आपला ठेका काही स्थानिकांना चालवण्यास दिलेला आहे, मासिक १६ लाखाचा ठेका त्यात ठेकेदारावर ठेकेदार ठेवल्याने कामात गुणवत्तेचा अभाव दिसून येत आहे. कंपनीचे कामाकडे दुर्लक्ष होत असून परीणामी गटारीचे पाणी रस्त्यावर येत आहे.

सांडपाणी दारावरुन व दुकानासमोरुन वाहत असल्याने तसेच नप व स्वच्छता एजन्सीकडून चोकअप काढले जात नसल्याने त्रस्त नागरीकांनी सांडपाणी या गटारीतुन बाजुच्या गटारीत वळवण्यासाठी सहा महिण्यापुर्वी नप प्रशासनाने बांधलेला रस्ता फोडला आहे.

शहरातील कापड मंडईतील हि समस्या गेल्या सहा महिण्यापासुन आहे. या भागातील नागरीक व दुकानदार हा सर्व प्रकार सहन करीत आहे, विशेष म्हणजे या भागात माजी मंत्री अनिल पटेल यांचे निवासास्थान पण आहे, नागरीकांचे तर सोडा या एजन्सीला माजी मंत्र्याचा धाक नसल्याने हा सर्व प्रकार घडत आहे, याकडे नपच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे.

मासिक १६ लाख ६६ हजाराचे देयक घेऊन देखील या ठेकेदाराने आपले स्वताचे कार्यालय न उघडता कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या संत एकनाथ ग्रंथालय तथा वाचनालयावर अतिक्रमण केलेले असुन, आता कोरोना संपल्याने प्रशासनाने पुन्हा या ठिकाणचे अतिक्रमण काढुन ग्रंथालय सुरु करण्याची मागणी वाचक करीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!