Share

कौतुकास्पद! हुंडा घेणाऱ्यांचे लग्न न लावण्याचा निर्णय, मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचा पुढाकार

Published On: 

नाशिक : अहमदाबादच्या आयेशा खान आत्महत्या प्रकरणामुळे सर्व समाजातील दहेज, हुंडा प्रथा पुन्हा चर्चेत आली आहे. हुंड्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत. यामुळे कैक स्त्रियांना छळ, अत्याचार सहन करावा लागतोय. त्यामुळे महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी हुंडा प्रथा खंडित करण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने पुढाकार घेतला आहे. मुस्लीम समाजातील दहेज घेणाऱ्याचा निकाह न लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिकच्या मालेगाव येथे नुकतीच राज्यभरातील ३५ जिल्ह्यांच्या ४०० मुस्लिम मुफ्ती, काझी, मौलाना इत्यादी धर्मगुरूंच्या ऑनलाइन बैठकीत दहेजवर दीर्घ चर्चा झाली. दहेज पद्धत समाजाला घातक आहे. इस्लामने अगदी साध्या व सोप्या पद्धतीने निकाह करण्यास मान्यता दिली आहे. दहेजविरोधात प्रबोधन करणे आवश्यक बनले आहे. प्रत्येक जबाबदार व्यक्तीने आपल्या शहरात दहेजविरोधात जनजागृती करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर कमी खर्चात साध्या पद्धतीने निकाह कसे करावेत याविषयी जनजागृतीसाठी ११ ते २० मार्चदरम्यान राज्यभर मोहीम राबवली जाणार आहे.

बैठकीत घेण्यात आलेले निर्णय
विवाह सोहळे साध्या पद्धतीने साजरे करण्यासाठी मोहीम राबवणे
तीन आठवडे प्रत्येक शुक्रवारी मशिदींमधून दहेजविरोधात जनजागृती
बळजबरीने हुंडा घेणाऱ्यांच्या विवाहात सहभागी न होता त्यांचे लग्न कोणीही लावू नये
बोर्ड सदस्यांनी तीन दिवस आपल्या भागातील जबाबदार व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क साधून मार्गदर्शन करणे
उपवर वधू व वरांशी संवाद साधून त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करून देणे

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!