Share

कौतुकास्पद ! पुण्यात बकऱ्यांच्या कुर्बानीऐवजी रक्तदान करून बकरी ईद साजरी

Published On: 

पुणे- संपूर्ण देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देऊन मुस्लिम बांधव हा सण साजरा करतात. परंतु पुण्यातील काही मुस्लीम बांधवांनी या परंपरेला छेद देत बकऱ्याची कुर्बानी देण्याऐवजी रक्तदान करू बकरी ईद साजरी केली. मुस्लिम सत्यशोधन मंडळाच्यावतीने या अनोख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. साने गुरुजी स्मारक येथील एका हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी बोलताना मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष समशोद्दीन तांबोळी म्हणाले, कोरोनाच्या या कठीण काळात सध्या देशात रक्ताचा तुटवडा जाणवतोय. त्यामुळे बकरी ईद च्या दिवशी प्राण्यांची कुर्बानी देण्याऐवजी स्वतः रक्त देऊन मानवतेसाठी ही बकरी ईद साजरी करता येईल अशी कल्पना आम्हाला सुचली. त्यानुसार आज राज्यातील वेगवेगळ्या शहरात हा उपक्रम सुरू आहे.

मुस्लिम सत्यशोधक मंडळ आला 50 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने राज्यातील मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ईद साध्या पद्धतीने साजरी करून काही पैसे एकत्र केले आणि हे पैसे करुणा विरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता निधी देण्यात येणार असल्याचेही समशोद्दीन तांबोळी यांनी यावेळी सांगितले. मुस्लिम बांधवांनी ईद निमित्त आयोजित केलेला या अनोख्या उपक्रमाचं कौतुक करण्यात येत आहे.

‘दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली’

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेल्या १ कोटी मधला एकही रुपया अजून आला नाही!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!