Share

राम मंदिरासाठी उद्धव ठाकरेंनी घोषणा केलेल्या १ कोटी मधला एकही रुपया अजून आला नाही!

Published On: 

अयोध्या: गेली कित्येक दशके राम मंदिराचा वाद चालू होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा निकाल अखेर लागला व राम मंदिराचा मार्ग मोकळा झाला होता. आता ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार असून अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. तर, शिवसेनेने राम मंदिरासाठी घोषणा केलेल्या १ कोटीपैकी १ रुपयाही आला नसल्याचं राममंदिर निर्माण ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांनी सांगितलं आहे.

तसेच,एका महिन्याच्या आत प्रत्यक्ष काम सुरू होईल. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना बोलावलं नसल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, सर्वांना बोलावलं जाईल. यावेळी शिवसेनेने एक कोटी दान देण्याची घोषणा केली होती त्याबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की, अजून काही माहिती नाही. आतापर्यंत एक रुपयाही आलेला नाही. मुरारी बापू देखील दान देणार होते पण अजून पैसे आले नाहीत. मात्र मंदिर निर्माणासाठी पैशांची कमी पडणार नाही, असंही ते म्हणाले. एबीपी माझाही बोलताना त्यांनी हा खुलासा केला आहे.

एकनाथ खडसेंनी राज्य सरकारवर केली टीका; म्हणाले, “मी कृषिमंत्री असताना…”

मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी, ‘नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा अयोध्येत आलो होतो आणि एक वर्षानंतर नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री झालो, असा योगायोगही यावेळी त्यांनी सांगितला. मला कळालं की ट्रस्टचं एक बँक अकाऊंट तयार झालं आहे. त्यामुळे शिवसेना ट्रस्टच्यावतीनं १ कोटी रुपयांचा निधी आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी देत आहोत. याचा ट्रस्टने स्विकार करावा,’ असं ठाकरे म्हणाले होते.

नाराजीचे कारण ठरलेल्या ‘महाजॉब्स’च्या जाहिरातीत काँग्रेसला मिळाले स्थान; या नेत्याचे झळकले फोटो

दरम्यान,केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांना चिमटा काढला आहे.राममंदिराच्या पायाभरणीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निमंत्रण आले किंवा नाही आले, तरी पायाभरणीला त्यांनी जावे. शिवसेनेचा नारा होता की ‘पहले मंदिर, फिर सरकार’ आता मात्र पहिले सरकार फिर मंदिर असे झाले आहे. उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राममंदिरच्या पायाभरणीसाठी प्रमाणपत्र घ्यावे लागेल, अशी टीका रावसाहेब दानवे यांनी केली.

चार-पाच लफडी ठेवणं शिवसेना आमदार खासदारांचा धंदा; निलेश राणेंचा घणाघात

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!