🕒 1 min read
औरंगाबाद: औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने ‘हर घर दस्तक’ ही विशेष मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत लस न घेतलेल्या नागरिकांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या घरोघरी जाऊन कोरोना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय(Aastik Kumar Pandey) हे स्वतः लस न घेतलेल्या नागरिकांच्या घरी जाऊन पोहोचले.
जगायचे असेल तर लस घ्या. आता आपण तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहोत, तरी अनेक नागरिक लस घ्यायला तयार नाहीत. प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे, लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरी रुग्णाला फारसा त्रास होणार नाही. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरजच पडणार नाही, असे मत मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले. याच्या अंमलबजावणीसाठी ते स्वत: नागरिकांच्या घरी पोहोचले.
मंगळवारी (दि. २८)प्रशासक पाण्डेय यांनी हर्सूल आरोग्य केंद्रा अंतर्गत सारा रिद्धी या परिसरात खाडेकर व इतर कुटुंबियांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांच्या ज्या सदस्यांनी दुसरी लस घेतली नव्हती त्यांना दुसरी लस घेण्यास प्रोत्साहित केले. मीरा नर्सिंग खाडेकर (४४ वर्ष), आरती नर्सिंग खडेकर (२१), मैथिली नाईक (२०), विजय पुंगळे (२१) यांनी यावेळी प्रशासकांसमोर लस घेतली. यावेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा आणि आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- तुमचं पत्र बदनामी करणारं; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर राज्यपाल कडाडले
- “अधिवेशनात सर्वात प्रभावी नेता, लोक म्हणतात फक्त दादा”, रुपाली पाटलांनी केले अजित पवारांचे कौतुक
- क्विंटन डी कॉक खेळणार नाही पुढील दोन कसोटी सामने; ‘हे’ आहे कारण
- …नाहीतर उपमुख्यमंत्री असे तोंडावर आपटले नसते; मनसेचा टोला
- ऋषभ पंतने मोडला महेंद्रसिंग धोनीचा ‘हा’ मोठा विक्रम


