औरंगाबाद : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व पुढाकाराने सिल्लोड तालुक्यातील आमठाण येथे उभारण्यात आलेल्या प्रशासकीय भवन इमारतीचे लोकार्पण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सोमवारी ( दि.२३ ) संपन्न झाले. तसेच एकदिवसीय धम्म शिबिर, हाडड्रोलिक बेडचे लोकार्पणही सत्तार यांच्या हस्ते झाले. या प्रशासकीय भवनात ग्रामीण भागातील नागरिकांचे अनेक कामे एकाच छताखाली होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ग्रामीण भागातील जनतेला तलाठी व इतर प्रशासकीय कामे तत्परतेने गावातच व्हावे यासाठी पहिल्या टप्प्यात सिल्लोड मतदारसंघातील विविध गावांत तलाठी भवन प्रशासकीय भवन उभारण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. येत्या काळात मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रशासकीय भवन उभारण्याचा मानस असून हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यभर प्रयोग राबविणार असल्याचे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी केले. तसेच भिक्खु बोधीधम्मा ‘धम्माचल’ अजिंठा व फर्दापुर प्रमुख वक्ते अरविंद बोध बंगलोर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली सिल्लोड येथे एक दिवसीय धम्म शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सत्तार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. सिजेंटा इंडिया लिमिटेड व जनजागृती प्रतिष्ठान औरंगाबादच्या वतीने सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयास २० हायड्रोलिक बेड भेट देण्यात आले. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते रविवारी ( दि.२२) या बेडचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा.लोखंडे, पंचायत समितीच्या सभापती डॉ. कल्पना जामकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने सज्ज रहावे तसेच नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभागी होवून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबाद महापालिकेत रंगले ‘मानापमान’ नाट्य; दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसा!
- जीएम-सोयाकेकच्या आयातीचा निर्णय रद्द करा राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
- पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचे भाग्य उजळणार; सर्वसमावेशक आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश!
- पीक विम्याचा प्रश्न; अग्रीम टाळण्यासाठी विमा कंपन्या दाखवत आहेत ३० टक्के नुकसान
- मोठी बातमी : संभाजीराजेंसह सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

