Share

‘आदित्यदादा, राजगडावर रोपवे बांधू नका…’; पुण्यातल्या दुर्गवेड्या चिमुकलीचं ठाकरेंना पत्र

Published On: 

पुणे : महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परकीय गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी व स्वराज्याची निर्मितीचे बळ हे याच गडकिल्ल्यांमधून मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य याची मशाल पेटवली. इतकंच नाही तर हिंदवी स्वराज्याची निर्मिती देखील केली. त्या भव्य ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असलेले गड-किल्ले आजही महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या कणखर दगडांच्या आधारावर उभे आहेत. मात्र, अनेक किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने ते भग्न अवस्थेत अंतिम घटका मोजत आहेत.

दरम्यान, सर्वच शिवभक्त, ट्रेकर्स, दुर्गवेड्या, भटक्यांचं श्रद्धास्थान म्हणून राजीयांचा गड म्हणजेच ‘राजगड’ला विशेष महत्व आहे. कणखर, बलाढ्य, अभेद्य आणि उंच अशा राजगडावर जाण्यासाठी सध्या अनेकांचा ओढा वाढला आहे. गड-किल्ल्यांप्रती असलेलं प्रेम आणि जागरूकता वाढली असली तरी तेथील पावित्र्यता, नैसर्गिक आणि ऐतिहासिक संपत्ती जपणं देखील तितकंच कठीण होत आहे.

अशातच, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे राज्यातील पर्यटन वाढीला भर दिला आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंनी पुणे जिल्ह्यातील एकविरा देवी मंदिर आणि राजगड किल्ल्यावर पर्यटकांना लवकरच रोप-वेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे एकविरा देवीच्या दर्शनाला अबालवृद्धांना अधिक सोयीचं होणार असून राजगडावरील रोप-वे बाबत मात्र विरोध वाढत आहे. गेले काही दिवस सोशल मीडियावरून राजगड रोप-वेला विरोध केला जात असून गडावर ऐतिहासिक वास्तू जपण्याचं व संवर्धनाच काम करावं, मात्र रोप-वे नको अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.

saisha

आता पुण्यातील एका चिमुकलीने रोपवे बनवू नका अशी मागणी थेट मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबतच पत्र देखील व्हायरल होत आहे. साईषा अभिजीत धुमाळ असं या छोट्या गडप्रेमीच नाव आहे. ‘माननीय आदित्य दादा यांस पत्रास कारण की, राजगडावर रोपवे बांधू नका. कारण गडावर आणि आजूबाजूला फुलपाखरु, हरण, मोर, ससे यांची घरं असतात. आपण गर्दी केली तर हे सगळे तिथून निघून जातील. त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर काढू नका प्लीज. मला ट्रेकिंगला गेल्यावर त्यांना लपून पाहायला, फुलपाखरांच्या मागे धावायला आवडतं. आपण त्यांना आपल्या घरी राहू देत नाही. मग त्यांना त्यांच्या घरामधून बाहेर पाठवतो. मी एक छोटी गडप्रेमी आणि ट्रेकर साईषा अभिजीत धुमाळ.’ असं या चिमुकलीने आपल्या पत्रात म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!