Share

Aditya Thackrey | आदित्य ठाकरे यांच्या ‘त्या’ वाक्यावरुन विधान भवनात उडाला गोंधळ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज मोठा गदारोळ उडाला. आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू झाला नसल्याचं, उत्तर दिलं होतं. यावर आक्षेप घेत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी योग्य ती आकडेवारी द्यावी दिशाभूल करू नये, अशी मागणी केली होती. मात्र गवित आपल्या उत्तरावर ठाम राहिले. आदिवासी विकासमंत्र्यांच्या या उत्तरावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेना आमदार आदित्य ठाकरे देखील संतापले आणि संतापाच्या भरात आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या एका वाक्यावरून सभागृहात मोठा गोंधळ उडाला.

आदित्य ठाकरे यांच्या वाक्यामुळे सभागृभात गोंधळः

आदिवासी भागातील परिस्थिती कशी आहे याची आपल्याला लाज वाटायला पाहिजे, तेच तेच उत्तर दिले जातं, सर्वपक्षीय समिती स्थापन करून मंत्री तोडगा काढणार आहेत का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. मात्र आदित्य ठाकरे यांनी वापरलेल्या लाज या शब्दावर आक्षेप घेत भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली.

सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोलः

आपल्या पित्याबद्दल आपण असं बोलतो का, ते ज्येष्ठ आहे, असा टोला सुधीर यांनी आदित्य यांना लगावला. यानंतर आदित्य ठाकरे यांची बाजू घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जयंत पाटील पुढे आलं. आदित्य परिस्थितीबद्दल भाष्य करत असून ते मंत्री विषयांचं वक्तव्य नसल्याचं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, याबाबत स्पष्टीकरण देत असताना सुधीर भाऊंचं भाषण ऐकून मी प्रेरित झालो आहे, मी एवढेच म्हणालो की या वर्षी आपण 75 वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला, ही आपली परिस्थिती आहे, त्यात मला सरकारला दोष द्यायचा नाहीये. मात्र नेते म्हणून मी आपल्याला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, यात मी काय चुकीचं बोललेलो नाही मी कुणाकडे बोट दाखवलं नाही आपण फक्त नेते म्हणून काम करायला हवं, असं स्पष्टीकरण आदित्य यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!