Share

Aditya Thackeray । पावणे दोन लाख कोटींचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कसा गेला?; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना संतप्त सवाल

Published On: 

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन हा 1.54 लाख कोटी गुंतवणूक असलेला उद्योग अचानक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा उद्योग पावणे दोन लाख कोटींचा आहे. या उद्योगासोबत १०७ इतर छोटे-मोठे उद्योग उभे राहणार होते. याच्या माध्यमातून ७० हजार ते १ लाख रोजगार निर्माण होणार होते. सध्या महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर आहे. यावरून आता माजी मंत्री आणि शिवेसना आमदार आदित्य ठाकरे हे शिंदे सरकारवर प्रचंड संतापले आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले कि, हे वातावरण महाराष्ट्राच्या विकासासाठी चांगलं नाही. आगामी काळात क्युबिक, एअर बस किमान हे प्रकल्प तरी महाराष्ट्रात यावेत, अशी आमची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या वेळीही मुंबईतील अनेक उद्योग अहमदाबादला गेले. स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्रासाठी धोके, असं हे सरकार आहे. ‘बाजीगर’ चित्रपटात एक डायलॉग आहे, ‘हार के जीतने वाले को बाजीकर कहते है’, पण या गुंतवणुकीच्या बाबतीत, जीत के हारनेवाले को खोके सरकार कहते है, असं लागू होतं” अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात अगरवाल यांनी ट्विट करताना म्हटलंय की हा प्रोजेक्टबद्दल उद्योग मंत्र्यांनी आणि स्थानिक प्रशासनानं मेहनत घेतल्याचं म्हटलंय. मग आपले उद्योगमंत्री आपलं खोके सरकार काय करत होतं. इथलं प्रशासन काय करत होतं. जी कंपनी महाराष्ट्रात जूनपर्यंत येणार होती. २६ जुलैला मुख्यमंत्र्यांच्या ट्विटरवर ट्विट आहे की, ही कंपनी इथेच येणार मग महिनाभरात असं काय घडलं”, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!