🕒 1 min read
पुणे : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे.
इंदापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात यासंदर्भात बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘नुसती भाषणे करून जनतेचे प्रश्न सुटत नाही. राज ठाकरे पलटी मारणारा माणूस असून टीका आणि नकला करण्याशिवाय त्यांना दुसरे काही जमत नाही.’ तसेच राष्ट्रवादीला आणि शरद पवारांनी जातीयवादी म्हणणारे स्वत: जास्त जातीयवादी आहेत. शरद पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यासारखे आहे, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, ‘१९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. परंतु, राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवले. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार. आपणच जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असू तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता.’ तसेच राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार आहे, असे राज ठाकरे २ एप्रिल रोजी पार पडलेल्या जाहीर सभेत म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2O22 : RCBमधून एक खेळाडू स्पर्धेबाहेर; ‘या’ खतरनाक खेळाडूला मिळाली संघात एन्ट्री!
- IPL 2022 CSK vs PBKS : लिव्हिंगस्टोनची वादळी खेळी; पंजाबचं चेन्नईला १८१ धावांचं आव्हान!
- IPL 2O22 : जोस बटलरनं ठोकलं शतक; क्रेडिट कोणाला दिलं माहितीये? वाचून हसाल!
- “…तर नरेंद्र मोदींशीवाय पर्याय नाही”; संजय राऊतांचा जुना व्हिडीओ व्हायरल
- IPL 2022: पंजाबचा विस्फोटक फलंदाज ओडियन स्मिथ आहे हिटमॅनचा फॅन; म्हणाला “मला त्याच्यासारखं खेळायचंय…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
