Share

“काम बोलता है भाई, काम बोलता है”, जितेंद्र आव्हाडांनी केले आदित्य ठाकरेंचे कौतुक

Published On: 

मुंबई: राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (State Environment Minister Aditya Thackeray) यांनी काल (२८ जानेवारी) नाशिकमधील शेंद्रीपाडा या दुर्गम आदिवासी गावात एका पुलाचे उद्घाटन केले. या गावात लोक आपला जीव धोक्यात घालून तात्पुरत्या बांबूचा पूल वापरत होते. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी स्वतः या पुलाची दखल घेतली होती.  त्यांच्या या कार्याचेच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) यांनी कौतुक केले आहे.

“काम बोलता है भाई, काम बोलता है गरिबांच्या वेदना जाणून घेऊन मदत करणे हाच मानव धर्म”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. यासोबतच त्यांनी आदित्य ठाकरे यांचा फोटोही पोस्ट केला आहे. अगोदर महिलांना बांबूच्या पुलावरून जीव धोक्यात टाकून ये-जा करावी लागत होती. मात्र पुलाच्या बांधकामानंतर ही समस्या दूर झाली आहे. याचेच कौतुक जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

दरम्यान शेंद्रीपाड्यातील महिलांची पिण्याचे पाणी नेताना होणारी कसरत समोर आल्यानंतर राज्य सरकारने दखल घेत ओढ्यावर लोखंडी पुल उभारण्यात आला आहे. या पुलाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच गावातील पेयजल योजनेचाही त्यांनी आढावा घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!