Share

रश्मी ठाकरेंची संपादक पदी निवड झाल्यावर आदित्य ठाकरे म्हणतात…

Published On: 

पुणे : मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर संपादक पदी राहण्यात अडचणी येऊ शकतात. अशी शक्यता असल्याने आजपासून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाचे संपादक पद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. सामनाच्या प्रेसलाईन मध्ये संपादक म्हणून सौ. ठाकरे यांचे नाव आजपासून लावण्यात आले आहे.

तर सामानाचे कार्यकारी संपादक म्हणून संजय राऊत काम पाहत आहेत. सामना नेहमीच आपल्या अग्रलेखांसाठी प्रसिद्ध आहे. आता सामनाच्या संपादकपदी रश्मी ठाकरे यांची निवड झाल्याने त्या सामनामध्ये काय बदल करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दम्यान, पुण्यात आयोजित एशिया इकोनॉमिक डायलॉग या कॉन्फरन्स पर्यावरण आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली. कॉन्फरन्सनंतर आदित्य ठाकरे यांना रश्मी ठाकरे यांची संपादकपदी निवड झाल्याबद्दल विचारण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, सामनाच्या संपादकपदी आईची निवड झाल्याने आनंद आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. ही एक मोठी जबाबदारी आहे, आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत.’

संपादक पद हे लाभाचे पद असल्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे ठेवण्यात अडचणी होत्या. सामानाच्या क्रेडिट लाईनमध्ये रश्मी ठाकरे यांचे नाव अधिकृतरित्या प्रसिद्ध करण्यात आले आहे. गेले काही महिने हे पद रिक्त होते. संजय राऊत संपूर्ण जबाबदारी संभाळत होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!