Share

‘महाविकास आघाडी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल’, आदित्य ठाकरेंचा विश्वास

Published On: 

मुंबई : शालेय अभ्यासक्रमात शेती या विषयाचा समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा, असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शिक्षणमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली. यासंबंधी शिक्षणमंत्री गायकवाड यांनी मंत्रालयात बैठक घेतली.

राज्य सरकाराच्या या निर्णयाचे शिवसेना नेते तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले आहे. तसेच महाराष्ट्रात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीचे ज्ञान प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. शेतीचा अभ्यास शाळेत शिकवला गेला तर विद्यार्थ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेती व्यवसायात भविष्यात आमुलाग्र बदल घडतील, हे निश्चित’ असं ट्विटही आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

तसेच महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल, हा मला विश्वास आहे असे म्हणत वर्षा गायकवाड आणि दादा भुसे यांना कौतुकास्पद निर्णयासाठी आदित्य यांनी आभार मानलेत.

दरम्यान, सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग ०.९३ टक्के असून तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास या प्रस्तावामुळे कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल, त्याशिवाय ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल, असे सांगून शेतीला प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे बैठकीत म्हणाले. तर पर्यावरणाचा समतोल राखणे व जैवतंत्रज्ञानावर आधारित शेतीला चालना देण्याची गरज या शिक्षणामुळे निर्माण होईल, असे मत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी मांडले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!