Aditya Thackeray । मुंबई : फॉक्सकॉन-वेदांता समुहाचा सेमीकंडक्टर प्लांट गुजरातमध्ये होणार असल्याचं निश्चित झालं आहे. त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सर्व प्रक्रिया झाली होती, असं ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. शिंदे फडणवीस सरकारमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे, असा आरोप होतो आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेतून पुन्हा शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बाजीगर चित्रपटातील डॉयलॉगचाही संदर्भ दिला.
आदित्य ठाकरे म्हणाले कि, फॉक्सकॉनबाबत व्हॉट्सअॅपवर खोटो मेसेज फिरवण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी अद्याप सविस्तर उत्तर दिलं नाही. सरकारने खुलासाही केला नाही. प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला?, याचं उत्तर मिळालं नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच ४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून प्रकल्प मागे राहिला. हे घडलं तेव्हा मुख्यमंत्री गणेश दर्शनात व्यस्त होते. त्यामुळे आता तरुणांच्या बेरोजगारीची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेतून फुटलेल्या ४० आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हटलं आहे. बाजीगर चित्रपटात हार कर जीतने वाले को बाजीगर कहते है असं आहे. मात्र इथे “जीत कर हारने वाले को खोके सरकार कहते है”, असं म्हणत आदित्य यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट आणू असं सांगितलं जातंय, पण हा प्रोजेक्ट गुजरातला का गेला यावर उत्तर दिलं गेलेलं नाही. सरकारकडून स्पष्ट उत्तर येईल, असं वाटलं होतं पण सरकारकडून उत्तर न येता व्हॉट्सअप युनिर्व्हसिटीवरून वेगळ्या गोष्टी येताहेत”, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली.
- Mangal Prabhat Lodha । अभियंता दिनानिमित्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभेच्छा
- आज लाँच झाली चार ड्रायव्हिंग मोड्स असलेली ‘ही’ दमदार बाईक! जाणून घ्या किंमत…
- Viral Video | अंगावर काटा आणणारा व्हिडीओ! गाडीचं बाॅनेट उघडून तो काम करत होता, गाडी धरला वेग अन्…
- Congress । फडणवीसांनी शर्थीचे प्रयत्न करून वेदांत फोक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणावा; काँग्रेसची मागणी
- High BP | तणावाव्यतिरिक्त, इतर कारणांमुळे देखील High BP ची समस्या उद्भवते, जाणून घ्या उपाय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

