मुंबई : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रोजेक्ट गुजरातला गेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात येण्याची सर्व प्रक्रिया झाली होती, असं ठाकरे सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या सुभाष देसाईंनी म्हटलं आहे. यावरून महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. शिंदे फडणवीस सरकारमुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे, असा आरोप होतो आहे. मात्र हा प्रकल्प गुजरातला गेल्याने राज्यातील विरोधी पक्षाचे नेते आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी आता यारून सरकारवर निशाणा साधला आहे.
खनिकर्म क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदांताने, तैवानची इलेक्ट्रॉनिक उत्पादने निर्मिती करणारी कंपनी फॉक्सकॉन या कंपनीच्या सहाय्याने भारतामध्ये १ लाख ५४ हजार कोटी गुंतवणूक असणारा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले होते. कालपरवापर्यंत हा प्रकल्प महाराष्ट्रात होणं अपेक्षित होते. मात्र अचानक गुजरातने हा प्रस्तावित महाकाय प्रकल्प आपल्याकडे वळवला. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी या घडामोडींनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, या प्रकरणात लक्ष घालावे आणि वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणावा.
सत्यजीत तांबे यांनी म्हटलं की, असा प्रकल्प कोरिया वगळता जगाच्या इतर कोणत्याही देशात आलेला नाही. चीनमध्ये देखील असा प्रकल्प नाही. वेदांता समूहाने हे तंत्रज्ञान देशात आणण्याचे ठरवले होते आणि महाराष्ट्राला या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली होती. इतकंच नाही तर या उद्योगाशी पूरक व्यवसायांमधूनही तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला असता. हा प्रकल्प गुजरातला जाणे हा महाराष्ट्रातील युवकांना बसलेला मोठा धक्का असून हा महाराष्ट्रातील जनतेला दिलेला आणखी एक धोका आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने अनेक युवकांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. देवेंद्र फडणवीसांनी शर्थीचे प्रयत्न करावेत आणि हा प्रकल्प महाराष्ट्रात आणावा, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्याः
- Mouni’s Baby Plan | आलिया भट्टनंतर, मौनी रॉय देखील तिच्या करिअरच्या शिखरावर आनंदाची बातमी जाहीर करेल?
- Ramdas Kadam | “नरेंद्र मोदींना बोलून प्रकल्प परत आणू शकतो का?” ; रामदास कदमांचा चर्चा करण्याचा सल्ला
- बाइक प्रेमींसाठी खुशखबर! ‘या’ बाईकवर आहे 4 लाखांची सूट ..
- मविआने आणलेले प्रकल्प ईडी सरकारने गुजरातला आंदण म्हणून दिले – विद्या चव्हाण
- MahaGenco | महानिर्मिती औष्णिक वीज केंद्रात नोकरीची मोठी संधी..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

