Share

गर्भपात केल्याच्या आरोपांवर अभिनेत्री समंथाचं स्पष्टीकरण

Published On: 

मुंबई : दक्षिण अभिनेता नागा चैतन्यपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्री सामंथा प्रभू यांची प्रचंड चर्चा झाली. यावरून या दोघांना प्रचंड ट्रोल देखील करण्यात आले. त्यांचे चाहते देखील या बातमीमुळे निराश झाले होते. घटस्फोट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समंथाने सोशल मिडीयावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.

घटस्फोट काळात समंथाविषयी अनेक अफवादेखील पसरल्या होत्या. इतकंच नाही तर तिच्यावर आरोप देखील करण्यात आले होते. त्यावरच आता समंथा व्यक्त झाली आहे. घटस्फोट घेतल्यानंतर समंथावर अनेक आरोप नेटकऱ्यांकडून लागवण्यात आले. त्यावरच आता समंथा व्यक्त झाली इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत परसवलेल्या अफवांवर तिने उत्तर दिल आहे.

अलिकडेच समंथाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत समंथा म्हणाली, माझ्या कठीण काळात तुम्ही मला जो भावनिक आधार दिला. तो पाहून मी खरंच खूप भारावून गेले आहे. तुम्ही दाखवलेल्या सहानुभूती, काळजी आणि अफवांपासून माझं संरक्षण केल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. ते सांगतात, माझं अफेअर होतं. मला मूल नको होतं. मी संधीसाधू आणि आणि आता तर मी गर्भपात केला अशी अफवा पसरली आहे. पण, घटस्फोटाची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत त्रासदायक असते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ द्या. माझ्या खासगी आयुष्यावर होणारे हे शाब्दिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण, तुम्हाला मी एक वचन देते, ज्या गोष्टी घडतायेत त्यामुळे आणि ते जे काही बोलतील त्या सगळ्यामुळे मी खचून जाणार नाही’, अशा आशयाची पोस्ट शेअर करत तिने कठीण काळात धीर देणाऱ्यांचे आभार मानले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!