मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. अनेक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमावा लागला आहे. या परिस्थितीमुळे अनेक मुलांनी आपल्या आई वडिलांचे छत्र हरवले आहे. अशा मुलांच्या मदतीसाठी आता मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री मदतीसाठी पुढे आले आहे. पल्लवी आणि विवेक कोव्हिड-१९ आजाराने पीडित झालेल्या मुलांना आणि कुटुंबांना दत्तक घेण्यासाठी एका एनजीओद्वारे मदत करत आहे.
कोव्हिड-१९ मुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी तज्ञांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन सत्र पल्लवी आणि तिचे पती विवेक रंजन अग्निहोत्री हे जोडपं आयोजित करत आहेत. याबाबत पल्लवी जोशी म्हणतात की, “या समुपदेशन सत्राचे लक्ष्य लहान मुले आणि किशोरवयीन मुले आहेत, ज्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आपले एक किंवा दोन्ही पालक गमवल्याने, मानसिक त्रासाला सहन करत आहेत. यासाठी या जोडप्याने “नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स (एनसीपीसीआर)” महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय बाल हक्क संरक्षण आयोग बरोबर करार केला आहे.
तर विवेक अग्निहोत्री म्हणतात की, मुलांचे मानसशास्त्रज्ञांकडून सुयोग्य देखरेखीखाली अत्यंत कौशल्यपूर्वक सत्रे घेतली जातात. आम्ही अशा मुलांचाही विचार करत आहोत ज्यांचे कुटुंब विलग्नवासात आहेत कारण कधी कधी भावनात्मक उथळपणामधून जात असलेल्या मुलांशी वागताना, त्यांना हाताळताना बहुतेक वेळा नातेवाईक कमी पडतात. अशा मुलांची चिंता आणि राग अनुभवण्याची सुद्धा एक पद्धत असते, कारण त्यांचा सांभाळ नातेवाईक किंवा जवळचे व्यक्ती करत असतात. कोरोनाच्या या परिस्थितीमध्ये अनेक सेलिब्रिटी पुढे येत गरजवंताना मदत करत आहेत. बॉलीवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी देखील या काळात लोकांच्या मदतीला पुढे धावून येत आहे. अशात आता पल्लवी आणि तिच्या पतीने अनाथ मुलांसाठी उचललेले हे पाऊल खूप महत्त्वाचे आहे.
महत्वाच्या बातम्या
- एबीचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन नाहीच; दक्षिण अफ्रिका बोर्डाने केले स्पष्ट
- ‘कोरोनाचा हाहाकार ; केंद्र व राज्य सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करू नये?’
- वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशनचा स्तुत्य उपक्रम, दररोज भागवताय शेकडोंची भूक!
- कोरोना हरतोच पण जिद्द हवी : शंभरी पार केलेल्या आजी-आजोबांनी कोरोनाला केलं चीतपट
- ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नहीं देती…’


