नवी दिल्ली- आपल्या दमदार अभिनयाने सिनेजगतात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तामिळनाडूतील काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. सोमवारी खुशबू यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोपवला होता.
Smt. Khushbu Sundar joins BJP in presence of senior BJP leaders at BJP headquarters in New Delhi. #JoinBJP pic.twitter.com/jSMCHHPP9y
— BJP (@BJP4India) October 12, 2020
नुकताच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता . यानंतर त्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात होती. खुशबू यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्राद्वारे आपला निर्णय कळवला होता. पक्षातील मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तींकडून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचे दमन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अभिनय कारकीर्दीला अलविदा करत खुशबू यांनी मे २०१० मध्ये डीएमकेत प्रवेश करून सक्रीय राजकारणाला सुरुवात केली होती. २०१४ साली एम. के. स्टॅलिन यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी डीएमकेला रामराम ठोकला. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
त्यांनी 2014 साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी काँग्रेस पक्षच देशातील नागरिकांचं भलं करू शकतो, काँग्रेसमध्ये आल्यानंतर मला घरी आल्याचा आनंद होत आहे. असं त्या म्हणाल्या होत्या. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं खुशबू यांना तिकीट नाकारलं होतं.
तामिळनाडूमध्ये खुशबू सुंदर यांचे चांगले राजकीय वजन आहे. त्याचा भाजपला पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत होऊ शकते. भाजप त्यांना स्टार प्रचारक म्हणून पुढे आणू शकते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुंदर ह्या कॉंग्रेसच्या स्टार प्रचारक होत्या.
महत्वाच्या बातम्या-
- मुंबई बत्ती गुल झाल्याने सर्वसामन्यांचे हाल; मुख्यमंत्र्यांनी दिले तातडीने चौकशीचे आदेश
- अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी गुणांची अट शिथिल
- दिग्गज अभिनेत्रीने कॉंग्रेसला ठोकला राम-राम ; भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता
- देशात 60 लाख कोविड रुग्ण झाले बरे; अर्ध्याहून अधिक रुग्ण ‘या’ पाच राज्यातले
- कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत सातत्याने घसरण सुरूच; बरे होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

