मुंबई : अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Punjabi) ही तिच्या सोशल मीडिया पोस्ट तसेच तिच्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. नुकताच काम्यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र तिच्या पहिल्या लग्नावरून खोचक शब्दांत चिडवणाऱ्या या कमेंटवर तिने लगेच सडेतोड उत्तर दिले आहे.
#लड़की_हूँ_लड़_सकती_हूँ pic.twitter.com/nCYgUQkB4o
— Kamya Shalabh Dang (@iamkamyapunjabi) December 8, 2021
काम्यानं नुकतेच इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. महिला सशक्तीकरणाबाबत काम्या या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. याच व्हिडीओवर एका युजरनं तिला ट्रोल करणारी कमेंट कली होती. ‘आपलं स्वत:चं लग्न वाचवू शकली नाहीस.. घटस्फोट (divorce) झाला. नंतर दुसरं लग्न केलंस. हे अतीच झालं’, असं या युजरने म्हटल्यानंतर काम्या त्याच्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. काम्यानं तिथेच या युजरच्या कमेंटवर प्रतिक्रिया दिली. ‘मग काय? मला आनंदी राहाण्याचा किंवा जगण्याचा काहीच अधिकार नाही का? घटस्फोट झाला म्हणून महिलांनी मरायचं का?’ घटस्फोटामुळे एखाद्या महिलेचं आयुष्य संपून जातं का? मला कमजोर समजू नका. मी मुलगी आहे, लढू शकते”, असं काम्या म्हणाली आहे.
https://www.instagram.com/tv/CXODs-BBDd1/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान काम्या पंजाबीचं २००३ मध्ये बंटी नेगीसोबत (Bunty Negi ) लग्न झालं होतं. २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना आरा नावाची एक मुलगी देखील आहे. घटस्फोटानंतर सात वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी काम्यानं शलभ दंगसोबत (Shalabh Dang) दुसरं लग्न केलं. तेव्हा देखील काम्या पंजाबीवर दुसऱ्या लग्नामुळे बरंच ट्रोलिंग झालं होतं. पण घटस्फोट हा फार वेदनादायी शब्द आहे. देव करो आणि असं काही कुणासोबतही न घडो. आपला समाज हा शब्द एखाद्या शिवीसारखा वापरतो. जर कुणाचा घटस्फोट झाला, कुणाला नव्यानं आयुष्य सुरू करायचं असेल, कुणी सिंगल पॅरेंट असेल तर त्यांना ट्रोल केलं जातं. लोक त्यांना पाठिंबा देत नाहीत’, असं काम्या म्हणाली होती.
महत्वाच्या बातम्या:
- तुमचे कू कृत्य जनतेसमोर उघडे करू – आशिष शेलार
- अंकिता लोखंडेच्या लग्नास विलंब? ; लग्नापूर्वी दिली दु:खद बातमी
- ‘महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का?’
- ओबीसी आरक्षण: राज्य सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात; ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी
- रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघड केला; आ. संदिपान भुमरेंच्या भावाची एकाला मारहाण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

