मुंबई : महाराष्ट्रात अमली पदार्थांच्या प्रकरणाबाबत नुकतीच एक बातमी चर्चेत आली आहे. काहीदिवसांपूर्वी पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला होता आणि 22 जणांना ताब्यात घेतले होते. या २२ जणांमध्ये कलाकार आणि नृत्यदिग्दर्शकांचा देखील समावेश होता. ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होत. त्या पार्टीकमधून पोलिसांनी ड्रग्ज आणि काही पैसेही जप्त केले होते. ताब्यात घेतलेल्यांमध्ये मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री हिना पांचालचाही समावेश होता.
दरम्यान, या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालसह सर्व २५ संशयितांना बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हिना पांचाळसह २५ संशयितांची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
गेल्या काही काळापासून ड्रग्स प्रकरणात अनेक खुलासे झाल्यानंतर आता पोलिस सर्व कलाकारांवर बारीक नजर ठेवून आहेत. आता ड्रग्ज प्रकरणाबाबत पोलिस अधिक कडक आणि सतर्क झाले आहेत. पोलिसांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना ड्रग्जसह पार्टी करताना अनेक वेळा अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का ; ‘या’ स्टार खेळाडूची माघार
- …अन् आबांनी कपिल पाटलांबाबत वर्तवलेली ‘ती’ भविष्यवाणी आज खरी ठरली !
- भाऊ कदमला भेटला त्याचा जबरा फॅन, चाहत्याचे प्रेम पाहून गेला भारावून
- …अन् नारायण राणेंना मिळाला पहिला मान ; घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
- शहर वासियांना आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा करा, मनसेची मनपा आयुक्तांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
