मुंबई: IPL 2022 सुरू होण्यास दोनच दिवस शिल्लक आहेत. यंदा २६ मार्चपासून आयपीएल खेळवण्यात येणार आहे. यातील पहिला सामना गतवर्षी अंतिम फेरीतील चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. आयपीएलच्या १५ व्या आवृत्तीसाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. तसेच, यावेळी प्रेक्षक आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहेत. पुन्हा एकदा प्रेक्षक स्टेडियममध्ये आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करताना दिसतील. अशा परिस्थितीत आता सर्वात मोठे अपडेट आयपीएल तिकिटांच्या विक्रीबाबत येत आहे.
IPL 2022 च्या सामन्यांच्या तिकिटांची विक्री २३ मार्चपासून सुरू होणार आहे. प्रेक्षक आयपीएल सामन्यांची तिकिटे ऑनलाइन खरेदी करू शकतात. भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. आयपीएल सामन्यांची तिकीट विक्री स्पर्धा सुरू होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी सुरू होते. मात्र यावेळी कोविडमुळे प्रेक्षकांच्या संख्येवर सुरू असलेल्या चर्चेमुळे ती लांबणीवर पडली होती. फॅन्स iplt20.com आणि Bookmyshow.com वर २३ मार्चपासून आयपीएल २०२२ च्या सामन्यांची तिकिटे ऑनलाइन खरेदी करू शकतात.
We’re just waiting for the ‘shubh muhurat’ now ???????? #StadiumPeMilo #staytuned #TATAIPL pic.twitter.com/7EUjpzuSZo
— BookMyShow (@bookmyshow) March 22, 2022
आयपीएलमधील प्रेक्षकांच्या संदर्भात BCCI आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात बरीच चर्चा सुरू आहे. कोविडची प्रकरणे कमी होत असल्याने प्रेक्षकांची क्षमता ४० टक्क्यांनी वाढवण्यासाठी बीसीसीआय महाराष्ट्र सरकारशी चर्चा करत आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत केवळ २५ टक्के गर्दीला परवानगी दिली आहे. यावेळी कोरोना महामारीमुळे बीसीसीआयने संपूर्ण आयपीएलचे आयोजन महाराष्ट्रात केले आहे. आयपीएलचे सर्व लीग स्टेजचे सामने मुंबई आणि पुणे येथे होणार आहेत. मात्र, प्लेऑफ कुठे होणार याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘द कश्मीर फाइल्स’ची बॉक्स ऑफिसवर घसरण; कमाईत होतोय एवढा टक्के तोटा!
- “आता मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य
- IPL 2022: आता काय करणार धोनी? स्पर्धेला दोन दिवस शिल्लक असताना समोर आली चिंताजनक बातमी!
- आव्हाडांनी असला भेकडपणा दाखवणे निराशाजनक आहे; ‘त्या’ वक्तव्यावरून भातखळकरांची टीका
- IPL 2022 : बापमाणूस हिटमॅन..! रोहित शर्माचा लेकीसोबतचा भन्नाट डान्स; पाहा VIDEO

