अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. मात्र यामध्ये नागरिकांचाही सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करण्यासाठीचे माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान जनतेच्या सहकार्याने यशस्वी करणार असल्याचे नामदार शंकरराव गडाख यांनी म्हटले आहे.
अभियान नेवासा तालुक्यासह जिल्हयात यशस्वीपणे राबवताना प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करुन त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे पथकामार्फत तपासणी करण्यात येईल. या मोहीमेमुळे जिल्हयात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीची ओळख होईल व त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना कोरोना आजारापासून आपणास वाचवता येईल. माझे कुटुंब माझी जबाबदारी ह्या मोहिमेची सुरुवात वडाळा (ता.नेवासा ) येथे नामदार शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत झाली.
तसेच ही मोहीम एक लोकचळवळ असून जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचे पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, प्रशासकीय यंत्रणा व नागरिक यांनी एकत्र येऊन कोरोना आजाराचा विनाश करण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन नामदार शंकरराव गडाख यांनी केले आहे.
तसेच त्यांनी कोरोना विषयक प्रशासन करीत असलेल्या उपाय योजनांची संबंधिताकडून माहिती जाणून घेतली. त्यावेळी नेवासा तालुक्यासह जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर सर्व आरोग्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. गरजू बाधित रुग्णांना ऑक्सीजनची व्यवस्था व बेडची सुविधा तात्काळ उपलब्ध करुन दिली पाहिजे. अशा सूचना ना.गडाख यांनी दिल्या आहेत.
यावेळी मुळा कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब मोटे, नेवासा तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुर्यवंशी, गटविकास अधिकारी शेलार साहेब यांच्यासह आशा सेविका, आरोग्यसेवक, आरोग्य कर्मचारी, तलाठी, सरपंच, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:-
- मराठा समाजाचे ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण
- ‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांनीच रचला ‘महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट!’ गृहमंत्र्यांनीच केला धक्कादायक खुलासा
- शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुढाकार, एकमुखाने पाठिंबा द्या – चंद्रकांत पाटील
- श्रीरामपुरात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कांदा निर्यात बंदी विरोधात आंदोलन
- ‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांनीच रचला ‘महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कट!’ गृहमंत्र्यांनीच केला धक्कादायक खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

