नवी दिल्ली : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देश्भारतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ कसा होईल, हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
अशात देशभरातून बळीराजाच्या आंदोलनाला पाठींबा मिळत असताना बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते अनुपम खेर यांनी नवीन कृषी कायद्यांविरोधात एक संतापजनक विधान केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, सरकारने शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या ऐकल्या पाहिजेत. मात्र, कधी कधी हे शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते. आंदोलनामध्ये सरकारच्या निषेधार्थ दाखवण्यात आलेले खलिस्तानी झेंडे ही एक चिंतेची गोष्ट आहे. अस म्हणत अनुपम खेर यांनी अकलेचे तारे तोडले आहे.
हे आंदोलन काही लोक हायजॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलन हायजॅक होत असल्याचे पाहुण दुःख होत आहे. आपल्या देशात शेतकऱ्याला देव मानले जाते. ते आपले अन्नदाता आहेत त्यांनी आपल्या देशासाठी जे काही केले त्याबद्दल मी त्याच्या आभारी आहे. अनुपम खेर पुढे म्हणाले की, काही लोक ज्यांना या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे काहीच देणे घेणे नाही तेही यामध्ये हात धुऊन घेत आहेत. शेतकरी त्यांचा अजेंडा ठेवूनच काम करत आहेत. मात्र काही लोकांमुळे आंदोलनाची दिशा बदलण्याची भिती वाटत आहे. जो कोणी अन्न खातो तो शेतकऱ्यांच्या या आंदोलनात शेतकऱ्याना साथ देईल.
महत्वाच्या बातम्या
- लोकशाही मार्गाने चालणाऱ्यांना देशद्रोही, नक्षलवादी ठरवले जात आहे : सचिन सावंत
- आज भीमसैनिकांनी आपल्या शिस्तीचे व संयमाचे दर्शन घडविले – उद्धव ठाकरे
- चैत्यभूमी येथे भव्य स्तूप उभारण्याची केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी
- कोविडविरुद्धच्या लढ्यात भारताने केला ‘हा’ आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार
- माझी नाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे : मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

