मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह त्याच्या आई- वडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाण हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पत्नी स्नेहा हिने पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने अनिकेतवर अनैतिक संबंध तसेच सिनेक्षेत्रात त्याच्यापेक्षा माझं नाव मोठे होईल, या भितीने पतीने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सांगितले आहे. तसंच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचं तिने तक्रारीत म्हंटल आहे.
अनिकेत मला मारहाण करुन लोकांसमोर खालच्या थराची वागणूक देत होता. सासू- सासरे यांनी माझ्यावर होणार्या अत्याचाराला न रोखता मुलाला साथ दिली, असं स्नेहाने तिच्या तक्रारीत म्हंटल आहे. ही घटना मुंबईतील दहिसर इथल्या विश्वासराव रेसिडेन्सीमध्ये १० डिसेंबर २०१८ ते 2 फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडली असल्याचं तिने म्हटलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून स्नेहा आणि अनिकेत यांच्यात वाद सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- कंगनाच्या वक्तव्यावर सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
- ‘धर्मयुद्ध बाजूला ठेवा, घटना मोठी आहे, असे सांगणारे बाळासाहेब होते’
- उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व; केशव उपाध्येंची मुख्यमंत्र्यावर टीका
- एसटी महामंडळाची कर्मचाऱ्यांना नोटिस; २४ तासांत कामावर हजर रहा अन्यथा…
- ‘विस्कळीत विचारांच्या अवाढव्य हिंदुत्वाला बाळासाहेबांनी वास्तूचे रूप दिले’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

