Share

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात पत्निने केला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल

Published On: 

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासरावसह  त्याच्या आई- वडिलांविरोधात पत्नी स्नेहा चव्हाण हिने कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पत्नी स्नेहा हिने पती अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत तिने अनिकेतवर अनैतिक संबंध तसेच सिनेक्षेत्रात त्याच्यापेक्षा माझं नाव मोठे होईल, या भितीने पतीने जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे सांगितले आहे. तसंच गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचं तिने तक्रारीत म्हंटल आहे.

अनिकेत मला मारहाण करुन लोकांसमोर खालच्या थराची वागणूक देत होता. सासू- सासरे यांनी माझ्यावर होणार्‍या अत्याचाराला न रोखता मुलाला साथ दिली, असं स्नेहाने तिच्या तक्रारीत म्हंटल आहे. ही घटना मुंबईतील दहिसर इथल्या विश्वासराव रेसिडेन्सीमध्ये १० डिसेंबर २०१८ ते 2 फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडली असल्याचं तिने म्हटलं आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून स्नेहा आणि अनिकेत यांच्यात वाद सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!