Share

अभिनेता आरोह वेलणकरने पहिल्यांदाच शेअर केला आपल्या चिमुकल्यासोबतचा फोटो

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मराठी ‘बिग बॉस फेम’ अभिनेता आरोह वेलणकरची पत्नी अंकिताने मार्च महिन्यात बाळाला जन्म दिला होता. अंकिता आणि त्याच्या चिमुकल्या बाळाची तब्येत ठीक असल्याचे त्यावेळी आरोहने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. त्यानंतर आज पहिल्यांदाच त्याने आपल्या चिमुकल्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत आरोहने आपल्या मुलाला हातात घेतलेले दिसत आहे.

https://www.instagram.com/p/COzoX63HW_Z/?utm_source=ig_web_copy_link

‘अर्जुन बाबाच तुझ्यावर खूप प्रेम आहे,’ असं कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे. आरोहच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनी कमेंट्स केल्या आहेत. आरोह आणि अंकिता दोघेही पुण्याचे आहेत मात्र अंकितचा चित्रपटसृष्टी आणि अभिनयाशी संबंध नाही. आरोहने ‘रेगे’ या चित्रपटातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. त्यानंतर ‘घंटा’ या चित्रपटातही तो झळकला होता. ‘लाडाची मी लेक गं’ ही त्याची मालिका सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.

सध्या कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळं आरोग्य यंत्रणावर ताण आला आहे. अनेक सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशात अनेक नागरिक आपणहून कोरोना रुग्णांना मदतीचा हात देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून आरोहनंही पुण्यातील काही सामाजिक संस्थांच्या साहाय्यानं कोरोना रुग्णांची मदत करण्याचे काम करत आहे. या कठीण काळात आरोह कोरोना रुग्णांना बेड्स, रेमडेसिव्हिर इंजेक्शन, व्हेंटिलेटर, ब्लड, प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याच सामाजिक कामं करत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!