🕒 1 min read
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पेनड्राइव्ह बॉम्ब टाकल्यानंतर आज (९ मार्च) सत्ताधारी पक्ष कोणता पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र त्यापूर्वीच राज्याचे गृहमंत्री यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे.
दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी फडणवीसांनी केलेल्या आरोपांनंतर पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली असून व्हिडिओ सत्यता पडताळून कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच यासंदर्भात ते सभागृहात उत्तर देणार आहेत. त्यामुळे नेमके आजच्या सभेत गृहमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फडणवीस नेमके काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला. ते म्हणाले की,”राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय विरोधकांची कत्तल करण्याचं कट कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. आणि याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कटही करण्यात आला.”
नेमके प्रकरण काय?
जळगावातील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करून आमदार गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी वसूल केल्याची तक्रार अॅड. विजय भास्कर पाटील यांनी केली होती. या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा नंतर पुण्यातील कोथरूड पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या:
-
Maharashtra Session 2022 : फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ आरोपानंतर सत्ताधाऱ्यांची आज भूमिका कोणती?
-
WTC सुरु असताना सामना ड्रॉ केल्यामुळे क्रिकेट रसिक संतापले; पॅट कमिन्सने दिली मोठी प्रतिक्रिया
-
भारतीय क्रिकेटच्या प्रगतीत पवारांचे महत्वाचे योगदान! बीसीसीआयच्या माजी पदाधिकाऱ्यांचे वक्तव्य
- वंचित बहुजन आघाडीकडून मुस्कान खानचा सत्कार करण्याचे जाहीर, भाजपचा विरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
