Share

सुशांतला वाटत होती रियाची भीती कारण…

Published On: 

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बरेच जण समोर आले, सुशांत सिंह निधन प्रकरणामध्ये अमली पदार्थ सेवन करणाऱ्या अभिनेता व अभिनेत्री हे प्रकरण सुद्धा समोर आले, सुशांत निधन प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे दरम्यान नवीन नवीन सत्य समोर येत आहे.  NCB ने या प्रकरणात अमली पदार्थ सेवन कनेक्शन शोधून काढले आणि अनेक जणांना अटक केली आहे.

अशातच आता सुशांतचा मित्र सिध्दार्थ पिठाणी याने अजून एक धक्कादायक खुलासा केला आहे. सुशांतच्या मृत्यूच्या काही दिवस अगोदर त्याची मॅनेजर दिशा सालीयान हीचा मृत्यू झाला होता. अशातच दिशाच्या मृत्यूची बातमी एकूण सुशांत बेहोश झाला होता अशी माहिती सिद्धार्थ पिठाणीने दिली आहे.

सिध्दार्थ पिठाणीच्या म्हणण्यानुसार दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतची तब्येत बिघडली होती. सुशांतला त्याच्या जीवाची भीती वाटत होती. सुशांतने सिध्दार्थला त्याची सुरक्षा वाढवण्यास सांगितले होते. सिध्दार्थने दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या आणि दिशाच्या मृत्यूचा एकमेकांशी संबंध आहे. सुशांत त्या दिवशी त्याचा लॅपटॉप, हार्ड ड्राइव्ह आणि कॅमेरा शोधत होता. यासाठी त्याने रिया चक्रवर्तीलाही फोन लावला होता पण तिने फोन उचलला नाही. सुशांत खूप अस्वस्थ झाला होता. तो रियाला फोन लावत होता पण ती फोन उचलत नव्हती.

सुशांतला त्यावेळी भीती वाटत होती की, रियाला त्याचे सर्व पासवर्ड माहीत आहेत. यावरून रिया सुशांतला अडकवू नये, अशी माहिती सिध्दार्थ पिठाणीने सीबीआयला दिली आहे. दरम्यान, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अमली पदार्थ कनेक्शन सापडल्यानंतर रिया चक्रवर्ती आणि शोविक चक्रवर्ती या दोघांना NCB ने अटक केली आहे. न्यायालयाने रियाला १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!