औरंंगाबाद : नामांकीत कंपनीच्या नावाने बनावट मोबाईलचे साहित्य विक्री करणाऱ्या पाच दुकानदारांवर कारवाई करीत पोलिसांनी जवळपास १ लाख ७१ हजार २७५ रूपये किंमतीचे बनावट साहित्य जप्त केले आहे. बनावट साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सादीया टॉकीज परिसरातील हायफाय मोबाईल अॅक्ससेरीजचे दिनेश गालाजी चौधरी, कृष्णा मोबाईल शॉपीचे कांतीलाल किसनाराम माली, मौर्य मोबाईल शॉपीचे संकेत विनोद गुगळे, जय श्रीराम मोबाईल अॅक्ससेरीज व स्पेअर पार्टचे नेमाराम मोहनलाल माली, परफेक्ट टेलिकॉमचे सय्यद विखार सय्यद नसीम यांच्या दुकानातून नामांकीत कंपनीच्या नावाने बनावट ब्लुटुथ हेडफोड, स्पीकर, मोबाईलच्या बॅटरी आदी साहित्य होत असल्याची माहिती अॅन्टी पायरसी ग्रुप सव्र्हीसेस एल.एल.पी.या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी रेवणनाथ विष्णू केकाण (वय ३९,रा.हडपसर,पुणे) यांना मिळाली होती.
रेवणनाथ केकाण यांनी याबाबत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ.गणपत दराडे यांच्या पथकाने बनावट मोबाईलचे साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे मारले. या कारवाईत पोलिसांनी पाचही दुकानातून जवळपास १ लाख ७१ हजार २७५ रूपये किंमतीचे बनावट ब्लुटुथ हेडफोड, स्पीकर, मोबाईलच्या बॅटरी आदी साहित्य जप्त केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
- कोणत्याही आंदोलनात हाणामारी करायची वेळ आली की राणे बंधू शेपुट घालुन पळ काढतात – वैभव नाईक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

