मुंबई : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. अमानुषपणे महिलांवर अत्याचार केले जात आहेत. राज्यात कायद्याचा कसलाच धाक राहिला नसल्याने आरोपींना बळ मिळत आहे. मुंबईमध्ये साकीनाका, पुण्यातील घटना अमरावती अशा एक ना अनेक ठिकाणच्या घटना रोज कानी पडत असतानाच आता डोंबिवली, कल्याणमध्ये अशाच घटना घडल्या आहेत. यावरुन राजकीय नेते सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धरत आहे. मात्र यावर कोणतेही राजकारण न करता मार्ग काढणे, उपाय करणे गरजेचे आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही पुन्हा भाष्य केले आहे.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना, महिलांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितेतची भावना, तसेच महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांवर धाक व दबाव आणण्यासाठी सरकारने विरोधी पक्षांसहित तातडीने बैठक घेऊन अँक्शन प्लॅन तयार करण्याची गरज आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना, महिलांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितेतची भावना, तसेच महिला अत्याचारांना आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांवर धाक व दबाव आणण्यासाठी सरकारने विरोधी पक्षांसहित तातडीने बैठक घेऊन अँक्शन प्लॅन तयार करण्याची गरज आहे. pic.twitter.com/emqQnqpiP5
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 24, 2021
मुंबईतील साकीनाका बलात्काराच्या घटनेने देश हादरला असताना पुन्हा एकदा डोंबिवलीत सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने सरकारला धारेवर धरले असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, महिला अत्याचारावर उपाययोजना करण्यापेक्षा मुख्यमंत्री राज्यपालांनी फॉरवर्ड केलेल्या निवेदनाला उत्तर देत आहेत. आता डोंबिवलीच्या घटनेनंतर तरी महिलांसाठी विशेष अधिवेशन सरकार घेईल अशी अपेक्षा आहे.’ अशी टीका मुनगंटीवार यांनी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यात घटना घडल्यावर अन्य राज्यांकडे बोट दाखविणे, ही असंवेदनशीलता : देवेंद्र फडणवीस
- ‘राज्यात काय चाललयं याचा थांगपत्ता नाही’; आरोह वेलणकरचा मविआ सरकारवर निशाणा
- कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
- ‘काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा आणि निष्ठा असणारे नेतृत्व गमावले’
- पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार जो बायडन यांची भेट; संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेलाही संबोधित करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

