🕒 1 min read
मुंबई : प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह आठ जणांना रविवारी अटक केली आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर महसूल गुप्तचर संचालनालयाकडून ड्रग्ज संबंधित अजून एक मोठी कारवाई केली आहे.
Directorate of Revenue Intelligence (DRI) Mumbai on Wednesday seized 25 Kg heroin worth Rs 125 crores from a container at Nhava Sheva Port. One businessman has been arrested and sent to custody till October 11: DRI Mumbai
— ANI (@ANI) October 8, 2021
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातून तब्बल १२५ कोटींचे हेरॉईन जप्त केले आहे. न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून २५ किलोहून अधिक हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. तसेच या कारवाईदरम्यान एका व्यवसायिकाला अटक करण्यात आली असून ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
Maharashtra | Mumbai Anti Narcotics Cell arrested two persons with 7 kg of heroin worth approximately Rs 15 crores from Dongri area of Mumbai today
— ANI (@ANI) October 6, 2021
दरम्यान, कोर्डेलिया क्रूझवर पार्टी करण्यासाठी अंमलीपदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी आर्यन खानला अटक केल्याप्रकरणी केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कार्यक्रम आयोजन करणाऱ्या कंपनीशी संबंधित चौघांसह आठ जणांना अटक केल्यानंतर एनसीबीचे धाडसत्र सुरुच आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बच्चू कडू यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणा दिल्याचा आरोप; बबलू देशमुख व वीरेंद्र जगताप यांच्यावर गुन्हा दाखल
- ‘..तर राष्ट्रवादी स्वबळावरही निवडणूक लढवू शकते’, शरद पवारांकडून मित्रपक्षांना कानपिचक्या
- राज्यात येत्या 6 दिवसात 90 लाख नागरीकांचं होणार लसीकरण; टोपेंनी केली ‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेची घोषणा
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- ‘देशाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात आल्याने खेळांना प्रोत्साहन मिळत आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

