नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. रेमडेसिविर, ऑक्सिजन याचा प्रचंड तुटवडा राज्यात जाणवत आहे. देशात देखील अशीच परिस्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशात तीन लाखांपेक्षा अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली.
अशा परिस्थिती देशात आता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. असा परिस्थितीत फ्रान्सनं आपला मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांनी भारताला संकटकाळात मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
भारतातील फ्रान्सचे राजदूत इमॅन्युअल लेनिन यांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचा संदेश ट्वीट केला आहे. ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारतातील नागरिकांना मी एकत्र राहण्याचा संदेश देत आहे. संघर्षाच्या या काळात फ्रान्स तुमच्यासोबत उभा आहे. या महासाथीनं कोणालाही सोडलं नाही. आम्ही तुमची मदत करण्यास तयार आहोत,’ असा इमॅन्युअल मॅक्राँ यांनी दिला आहे. सध्या भारतातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १.६२ कोटींच्या वर पोबोचली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ८९ हजार ९२० जणांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारसाहेब तुम्ही काही करू नका, नाहीतर तुमचे साखर कारखाने हवेतील ऑक्सिजन पण सोडणार नाहीत’
- निलेश लंकेंनी शब्द पाळला; बिनविरोध ग्रामपंचायतींना २५ लाखांचा निधी दिला
- राज्याच्या ऑक्सिजन संकटात आता शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना लिहिलं पत्र
- सेवानिवृत्त धारकांचे महिन्याच्या पाच तारखेच्या पेन्शन करा- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले
- रुग्णांना जीवदान देणारी रुग्णालये निष्कळजीपणामुळे मृत्यूचे सापळे ठरू नयेत – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

